धनगर आरक्षणासाठी युवकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न Pudhari Photo
बीड

नशिब बलवत्तर | धनगर आरक्षणासाठी गळफास घेतला, वेळीच मित्र धावल्याने जीव वाचला

पुढारी वृत्तसेवा

केज, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी केकतसारणी (ता. केज) येथे एका गळफास घेवून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या दोन मित्रांनी पत्रे उचकटून त्याचा गळफास सोडविल्याने त्याचे प्राण वाचले. तरुणावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केज तालुक्यातील केकतसारणी येथे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी अनंत धायगुडे, संदीपान धायगुडे, अंकुश मन्नाडे, महादेव नरवडे या तरुणांनी सोमवारी (दि.1) जुलैपासून गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने उपोषण सुरू आहे.

दरम्यान, गावातील तरुण अजय शिंदे याने बुधवारी (दि.3) सकाळी उपोषणाला बसलेल्या तरुणांना भेटून घरी आला. घरी कोणी नसल्याचा फायदा घेवून पत्र्याच्या आडुला दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपोषणाला भेट देवून आल्यानंतर अजय शिंदे यांच्या मानसिकतेत झालेला बदल त्याच्या मित्रांच्या लक्षात आलेला होता. त्यात अजय शिंदे याने घरी जावून घराचा दरवाजा आतून बंद केल्यामुळे त्यांना संशय आला. म्हणून त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे समजताच विशाल धायगुडे आणि किरण धायगुडे या त्याच्या दोन मित्रानी घरावरील पत्रा उचकटून घरात प्रवेश करीत अजय शिंदे याचा गळफास सोडवला. अशी माहिती अजय शिंदे याचा भाऊ विजय शिंदे यांनी दिली असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजय शिंदे याने संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समजले. या घटनेचा तपास सुरु आहे. तसेच त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT