Beed Accident
धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढताना अपघात होऊन एकाचा मृत्यू  file photo
बीड

धावत्या दुचाकीवर सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा मृत्यू, एक जखमी

पुढारी वृत्तसेवा

बीड : धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवताना अपघात होवून एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली. अपघाताची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघेही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत.

सोलापूर-धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे. दुजाकीवरून निघालेल्या दोन तरूणांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला. या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. पोलीस अधिक तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT