Crime News representative image Pudhari
बीड

Beed Crime News: शेतीच्या वादातून चाकू हल्ला; एक गंभीर, चार जखमी

केजमधील शिरूर घाट येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Beed Crime News

केज : केज तालुक्यातील शिरूर घाट येथे शेतीच्या वादावरून एकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये एकजण गंभीर जखमी असून अन्य चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.

शिरूर घाट तालुका केज येथील राजेंद्र उर्फ राजाभाऊ सुभाष सांगळे यांनी त्यांच्या शेतामध्ये विहीरीचे खोदकाम केले आहे. मात्र, विहिरीचा अर्धा हिस्सा हा त्याचा चुलता भिमराव रामभाऊ सांगळे याच्या शेतात आहे. या कारणावरून मंगळवारी (दि. ३०) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात भांडण झाले. राजेंद्र उर्फ राजाभाऊ सांगळे याने त्याचा चुलता भिमराव सांगळे, चुलतभाऊ मोहन सांगळे आणि चुलता अर्जुन सांगळे यांना काठीने मारहाण केली. त्यात भीमराव सांगळे याच्या डोक्यात मार लागल्याने जखमी झाले. मोहन आणि अर्जुन यांच्या पायावर काठी लागल्याने जखमी झाले.

यावेळी शेजारी राहत असलेले सुंदर धनराज सांगळे व त्याचा मुलगा बालाजी सुंदर सांगळे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता राजेंद्र याने त्यांच्यावरील मागील भांडणाचा राग मनात धरून सुंदर याच्या पोटात चाकू खुपसला. यामध्ये सुंदर गंभीर जखमी झाला. तर त्याचा मुलगा बालाजी हा देखील जखमी झाला. सुंदर याच्यावर बीड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT