ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे file photo
बीड

ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगा

पुढारी वृत्तसेवा

बीड : सध्या बहुतांश व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. याबरोबरच समाजमाध्यमांमधून देखील आपला अनेकांशी संपर्क येत असतो. अशा वेळी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. ती बाळगली नाही तर फसवणूक होऊ शकते असे प्रतिपादन धुळे येथील सायबर तज्ज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले.

बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने अॅड. चैतन्य भंडारी यांच्या सायबर विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रोहिदास येवले, उपाध्यक्ष अॅड. नितीन बाघमारे, अॅड. अविनाश गडगे सचिव, गासेर पटेल यांची उपस्थिती होती. सध्या सोशल मीडिया व्हाट्सअप, फेसबुक इंस्टाग्राम, फोन, मेसेज करून आपल्या कळत नकळत आपले बैंक खात्यावरून पैसे मोठ्या प्रमाणावर रकम फ्रॉड करून सायबर भामटे वर्ग करून घेत आहे.

तसेच अश्लिल फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सेक्सटॉर्शन करणे, पैसे उकळणे, वगैरे गुन्हे समाजात घडत असतात. हे गुन्हेगार दृश्य स्वरूपात समीर नसतात परंतु कार्यरत असतात या सर्वाबाबत अॅड. भंडारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुरवातीला प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रोहिदास येवले यांनी प्रास्ताविक करून विधिज्ञांसाठी सायबर गुन्हे व सुरक्षा यावर मार्गदर्शन आवश्यक असल्याने हा कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले.

प्रमुख पाहुणे अॅड. चैतन्य भंडारी यांची ओळख अॅड. रतिलाल भंडारी यांनी उपस्थित सदस्यांना करून दिली, कार्यक्रमास सहसचिव अॅड. श्रीकांत जाधव, कोषाध्यक्ष धनंजय गिराम, ग्रंथपाल सचिव भीमा जगताप, वकील संघाचे अनेक जेष्ठ सदस्य, नवोदित विधिज्ञ, महीला विधिज्ञ, लॉ कॉलेजचे विद्यार्थी, उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन महिला प्रतिनिधी अॅड. छाया वाघमारे यांनी मानले. सदरील कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अॅड. किर्ती कुलकर्णी यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT