Beed News : महाविद्यालयात घुसून दिव्यांग महिलेवर अत्याचार (Pudhari File Photo)
बीड

Beed News : महाविद्यालयात घुसून दिव्यांग महिलेवर अत्याचार

नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी; बीड जिल्हा न्यायालयाचा निकाल, १३ साक्षीदार ठरले महत्त्वाचे

पुढारी वृत्तसेवा

Disabled woman atrocities by a man after entering college

बीड, पुढारी वृत्तसेवा : नेकनूर येथील महाविद्यालयात कार्यरत असलेल्या एका दिव्यांग महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. २) दोषी ठरवले. न्यायालयाने या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशाल जाधव (रा. नेकनूर, ता. जि. बीड) असे शिक्षा झालेल्या आर-ोपीचे नाव आहे.

ही संतापजनक घटना २८ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती. पीडित महिला नेकनूर येथील एका महाविद्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी दुपारी विद्यार्थी आणि शिक्षक बाहेर गेल्याने ती एकटीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत बसली होती. त्यावेळी आरोपी विशाल जाधव महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत आला. पीडितेने त्याला हटकले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

संशय आल्याने महिलेने तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशालने बळजबरीने तिचे तोंड दाबले आणि तिला ओढत भिंतीच्या बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहाय्यक सरकारी वकील अनिल बी. तिडके यांचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश एस. एस. घोरपडे यांनी विशाल जाधव याला दोषी ठरवले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल तिडके यांनी बाजू मांडली, त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी सहकार्य केले.

१३ साक्षीदार, वैद्यकीय पुरावा

तत्कालीन तपास अधिकारी, महिला पोलिस उपनिरीक्षक एस. के. कोळी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेचा जबाब, डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आणि न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे पुरावे महत्त्वाचे ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT