बीड

दिंद्रुड परिसरात वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; परिसरात मोठी खळबळ

3 महिलांची सुटका, दोन आरोपी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या ठिकाणी दिंद्रुड पोलीसांनी व अनैतिक मानवी वाहतूक कक्ष बीड यांनी संयुक्तरीत्या शुक्रवारी धाड टाकली. यामध्ये 3 महिलांची सुटका करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.

पोलिस हद्दीतील तेलगाव येथील साखर कारखाना परिसरात वेश्याव्यवसाय चालतोय या गोपनीय माहिती आधारे दिंद्रुड पोलिसांसह बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या टिमने शुक्रवारी संयुक्तरीत्या धाड टाकली. यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या 3 महिलांची सुटका करून हा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मिना सुर्यवंशी व अनंत कोथिंबीरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश भोसले, पो.उप.निरीक्षक पल्लवी जाधव, पवनसिंग जंघाले यांनी केली. दरम्यान आरोपींना धारूर येथील न्यायालयात सादर केले असता जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश मिळाल्याने रवानगी करण्यात आल्याची माहिती सपोनी भोसले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT