Dharur Ghat National Highway Commuters suffer as traffic is disrupted
अतुल शिनगारे
धारूर : पालखी मार्ग असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी वरील धारूर आंबेडकर चौक ते धुनकवड पाटी या १२ किलोमीटर अरुंद रस्त्यामुळे धारूर घाटात नेहमीच वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार होत आहे. यामध्ये राष्ट्रीय रस्ते विकास मंडळ व एमएसआरडीसी यांच्या वादामध्ये हा रस्ता रुंदीकरण गेल्या अनेक वर्षा पासून रखडला असून याचा त्रास मात्र प्रवासी व वाहतूकदारांना सहन करावा लागत आहे.
त्यामुळे तात्काळ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या घाटाचे रुंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. लोकप्रतिनिधी व नेत्यांनी श्रेयासाठी डांगोरा पिटण्यापेक्षा या रस्त्या रुंदीकरणाकडे लक्ष द्यावे अशीही मागणी होत आहे.
धारूर ते तेलगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग पालखी मार्ग ५४८ सी हा होऊन दहा वर्षाचा कालावधी होता आला तरीही धारूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते धुनकवड पाटी हा १२ किमी रस्ता अद्याप ही रुंदीकरण न झाल्याने व यामध्ये तीन किलोमीटर धारूर चा अवघड घाट असल्याने वाहतुकीस नेहमीत अडथळे होत आहेत.
घाटामध्ये वाहतूक रखडणे व एखादे वाहन बिघडले किंवा अपघात झाला तर कित्येक तास वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार हा नियमित चा खेळ झाल्याने सर्व वाहनधारक व या रोडने येणारे दहा ते पंधरा गावचे नागरिक बेजार होऊन गेले आहेत एम एस आर डी सी ने हा रस्ता करताना निकृष्ट दर्जाचा करून काम आटपले मात्र आता रस्ता रुंदीकरणाचा हा राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे जात असल्याने दोन्ही विभागाच्या वादात त्या रस्त्याचे रुंदीकरण रखडत पडले आहे.
नेहमीच विविध नेते राष्ट्रीय महामार्ग मंत्र्याची भेट घेतलेले फोटो छापून व रस्ता होत असल्याचे दाखवून नागरिकांची दिशाभूल करत आहेत मात्र वाहतूक दाखवून नागरिकांची दिशाभूल करत आहेत मात्र वाहतूक रखडणे व अपघात हे या रस्त्यावर नियमितचे झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग व एमएसअ-ारडीसी यांच्यातील वाद हा निपटून तात्काळ या रस्त्याचे रुंदीकरण करावे व नागरिकांचा प्रश्न मार्गी लावावा नेहमीची अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.