शिर्डीत धनराज मुंडे यांच्याकडून साईबाबांचरणी सुवर्णहार अर्पण file photo
बीड

शिर्डीत धनराज मुंडे यांच्याकडून साईबाबांचरणी सुवर्णहार अर्पण

वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील युवा नेते धनराज मुंडे यांनी कुटुंबासह शिर्डी येथे भेट देत साई बाबा मंदिर, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले.

पुढारी वृत्तसेवा

Dhanraj Munde offers a golden garland to Sai Baba in Shirdi

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : वडवणी तालुक्यातील कोठारबन येथील युवा नेते धनराज मुंडे यांनी कुटुंबासह शिर्डी येथे भेट देत साई बाबा मंदिर, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांच्या समाधीसमोर ५९.४० ग्रॅम वजनाचा सुवर्णहार अर्पण केला.

या सुवर्णहाराची किंमत सुमारे १० लाख १८ हजार रुपये असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. साईबाबाबांवर आपली अपार श्रद्धा असुन मागितल्यापेक्षा जास्त मला मिळाले आहे. असे युवा नेते धनराज मुंडे यांनी प्रतिक्रिया आहे.

शिर्डी येथील साईबाबा संस्थान येथे सकाळी मंदिरात आगमन झाल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. विधीपूर्वक पूजन करून त्यांनी साईबाबांच्या समाधीसमोर सुवर्णहार अर्पण केला.

अर्पणाच्या वेळी कुटुंबीयही उपस्थित होते. धार्मिक वातावरणात मंत्रोच्चारांच्या गजरात हा सोहळा पार पडला. मंदिर प्रशासनाने सुवर्णहाराची अधिकृत नोंद केली असून तो मंदिराच्या दान नोंदवहीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

देणगी संदर्भातील सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंडे कुटुंबीयांनी मिळेल दिली. याप्रसंगी धनराज मुंडे यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात त्यांच्या भेटीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भाविकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT