वाल्मीक कराड यांना जीवे मारण्याची धमकी; दोघांवर गुन्हा दाखल  Pudhari Photo
बीड

वाल्मीक कराड यांना जीवे मारण्याची धमकी; दोघांवर गुन्हा दाखल

वाल्मीक कराड यांना जीवे मारण्याची धमकी; रामकृष्ण बांगर, विजयसिंह बांगर यांच्याविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

परळी, पुढारी वृत्तसेवा : पाटोदा तालुका दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून वारंवार पैशाची मागणी करून वाल्मीक बाबूराव कराड (रा. परळी) यांच्या श्री गणेश कन्सट्रक्शनकडून १ कोटी ६९ लाख ७५ हजार ३३५ रूपये ट्रान्सफर करायला लावले. कराड यांनी पैसे परत मागितल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वाल्मीक बाबुराव कराड यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात रामकृष्ण मारोतराव बांगर, विजयसिंह रामकृष्ण बांगर (रा. पाटोदा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

वाल्मीक बाबूराव कराड (वय ५४, व्यवसाय सामाजिक कार्य व गुत्त वेदारी रा. परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बांगर यांनी माझा विश्वास संपादन करून त्यांच्या पाटोदा तालुका दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था दूध उत्पादक व पुरवठा संघ मर्या. पाटोदा ही सहकारी संस्था आर्थिक अडचणीत असल्याचे सांगून वारंवार पैशाची मागणी केली. कराड यांच्या श्री गणेश कंन्स्ट्रक्शन वरून दि. २८ जुन २०२३ रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप. सोसायटी शाखा सिरसाळा येथून १ कोटी ६९ लाख ७५ हजार ३३५ रूपये ट्रान्सफर करायला लावून खात्यावर घेतले.

त्यानंतर कराड यांनी बांगर यांच्याकडे या पैशाची मागणी केली असता त्यांनी पुन्हा पैसे परत मागितल्यास जीवे मारण्याची धमकी देवून स्वतःच्या खिशामध्ये कराड यांच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करून कराड यांचे राजकीय आयुष्य उध्दवस्त करण्याची धमकी दिली. त्याचबरोबर पैसे परत न करता वाल्मीक कराड यांचा विश्वासघात व फसवणूक केली.

या प्रकरणी कराड यांच्या फिर्यादीवरून रामकृष्ण बांगर, विजयसिंह बांगर यांच्याविरूध्द कलम ४०६, ४२०, ५०६, ३४ भांदवी प्रमाणे सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि दहिफळे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT