Death threat issued to the Chief Officer of Beed Municipal Council over plot records.
बीड : पुढारी वृत्तसेवा प्लॉटच्या व्यवहाराची नोंद घेताना झालेली चूक दुरुस्त करावी आणि संबंधित कर्मचाऱ्यावर आपल्या मर्जीप्रमाणे कारवाई करावी, या मागणीसाठी एका व्यक्तीने थेट मुख्याधिकाऱ्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. हा खळबळजनक प्रकार बीड नगरपालिकेत घडला असून, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी याप्रकरणी ७ मे रोजी पोलिसांना पत्र दिले आहे. आज, सोमवारी ते रीतसर गुन्हा दाखल करणार आहेत.
बीड शहरातील मूळ रहिवासी असलेला एक व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबियात वास्तव्यास होता. त्याने तिथून वेळोवेळी पाठवलेल्या पैशांची गुंतवणूक स्वतःच्या नावे व्हावी, असा त्याचा आग्रह होता. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी तशी प्रक्रिया केली नव्हती. सौदीतून परतल्यानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने नगरपालिकेत चौकशी केली असता, नोंदणी करताना कार्यालयीन प्रक्रिया पार पाडली नसल्याचे समोर आले.
याबाबत त्याने मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यालयीन कारवाई करून योग्य नोंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तो व्यक्ती संबंधित कर्मचाऱ्यावर मी सांगतो तशीच कठोर कारवाई करा, असा वारंवार आग्रह धरत होता. मुख्याधिकाऱ्यांनी नियमबाह्य काम करण्यास नकार दिला. या रागातून संबंधित व्यक्तीने मुख्याधिकाऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर प्रकारानंतर पालिकेत खळबळ उडाली आहे.
कार्यालयीन कामकाज नियमानुसारच : फडसे
संबंधित तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही कारवाई केलेली आहे. मात्र, त्यांच्याकडून वारंवार विशिष्ट आणि नियमबाह्य कारवाईसाठी आग्रह धरला जात होता. ते शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितल्यानंतर त्यांनी मोठ्या आवाजात धमकी देण्यापर्यंतचा प्रकार केला. यासंदर्भात मी पोलिसांना पत्र दिले असून, सोमवारी रीतसर तक्रार दाखल करणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी दिली.
चौकशीनंतर गुन्हा दाखल होईल
बीड शहर पोलिसांना ७ मे रोजी पत्र प्राप्त झाले आहे. त्यातील तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, ते सोमवारी पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार देणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती बीड शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वैभव पाटील यांनी