बँकेच्या वसुली पथकाने थकबाकीदारांच्या दारात जाऊन डफडे वाजून कर्ज वसुली केली Pudhari News Network
बीड

बँकेची कर्ज वसुलीसाठी अनोखी युक्ती; भाजप नेत्याच्या दारात वाजविले डफडे

थकबाकीदारांच्या घरासमोर डफडे वाजवून बीड जिल्हा बँकेची कर्ज वसुली

पुढारी वृत्तसेवा

केज : बीड जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली पथकाने केज येथे आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश राव आडसकर आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रमराव मुंडे यांच्यासह बँकेच्या थकबाकीदारांच्या दारात जाऊन डफडे वाजून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. याची खुमासदार चर्चा जिल्ह्यात होत आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवार (दि.३) बीड जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक तथा जिल्ह्याधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशाने आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपचे नेते रमेश आडसकर तसेच माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विक्रमराव मुंडे यांच्यासह महसूल कर्मचारी पतसंस्था यांच्याकडे लाखो रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्ज वसुलीसाठी बीड जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली पथकाने रमेशराव आडसकर आणि विक्रम मुंडे यांच्या केज येथील वकीलवाडी भागात असलेल्या निवासस्थानाच्या दारात डफडे वाजविले. यावेळी डी.सी. सी. बँकेचे जिल्हा व्यवस्थापक शरद ठोंबरे, उपव्यवस्थापक डी व्ही कुलकर्णी, उप व्यवस्थापक एस बी थोरात आणि सहाय्यक व्यवस्थापक एन एम रामटेके यांच्यासह बँक कर्मचारी हजर होते. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही भाजपच्याच नेत्यांच्या दारात डफडे वाजविल्याची चर्चा केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात होत आहे.

कोणाकडे किती थकीत कर्ज

  • आंबा सहकारी साखर कारखाना - १८ कोटी रु

  • विवेकानंद करचारी पत संस्था म. चिंचोली (माळी)- १.७५ कोटी रु

  • राजीव गांधी जीनिंग व प्रेसिंग सह. पतसंस्था सारुळ - २८८१०१४ रू

  • रेणुकामाता तेलबिया उत्पादक सह. सस्था म. देवगाव - १०९९१५४६ रू

  • महसूल कर्मचारी पत संस्था ८५२५४२ रू

थकबाकीदार धास्तावले

बीड जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या कारवाईमुळे थकबाकीदार धास्तावले असून या डफडे बजाव आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज्य शासनाने कारखान्यासाठी कर्ज मंजूर केले असून येत्या काही दिवसात कारखान्याकडे थकीत कर्ज परतफेड करण्यासाठी धनादेश देण्यात येणार आहे. अशी माहिती चेअरमन यांनी वसुली पथकाला दिली असल्याची माहिती डी सी सी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक शरद ठोंबरे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT