Woman Assault Pudhari
बीड

मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दे... म्हणून नराधमाने केला माय लेकीचा विनयभंग

Beed Crime News | मुलीच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : महिला अल्पवयीन मुलगी घरी असताना एका तरुणाने मागील बाजूने घरात प्रवेश करून विवाहिता व तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. दरम्यान महिलेच्या पतीवर विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

केज तालुक्यातील एका गावात दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या सुमारास एक तरुण दारु पिऊन घराचे पाठीमागे लावलेले पत्र्याचे शेडवरुन उडी मारुन आत आला. त्याने विवाहित महिलेच्या अंगाशी झोंबाझोंबी केली. त्याचा जाब विचारताच त्याने त्या विवाहितेला शिवीगाळ केली आणि म्हणाला की, "तुझ्या मुलीला माझ्या सोबत लग्न करण्यास सांग." असे म्हणुन मुलीच्या अंगाला वाईट उद्देशाने स्पर्श केला. तसेच म्हणाला की, मुलीचे लग्न जर त्याच्या सोबत केले नाही, तर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली.

त्यानंतर ती महिला व तिच्या पतीने याचा त्याला जाब विचारला असता त्याने पुन्हा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धारदार विळ्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या तक्रारी वरून आशीष अशोक धिवार याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. २१९/२०२६ भा. न्या. सं. ७४, ३५१, ३५१(२), ३५२, ३२९ आणि पोक्सोचे कलम ८, १२, १८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT