अल्पवयीन मातेच्या प्रसूतीदरम्यान बालविवाहाचा पर्दाफाश file photo
बीड

अल्पवयीन मातेच्या प्रसूतीदरम्यान बालविवाहाचा पर्दाफाश

सात जणांवर गुन्हा; बालविवाहांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Child Marriage Exposed During Delivery of Minor Mother

केज, पुढारी वृत्तसेवा : प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका अल्पवयीन मातेमुळे बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात वाढत्या बालविवाहांच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथील शासकीय रुग्णालयात २६ मार्च रोजी सकाळी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलेचे वय आधारकार्डवरून अवघे १७ वर्षे ८ महिने असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संबंधित अल्पवयीन मुलीने त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता एका मुलास जन्म दिला. चौकशीत असे निष्पन्न झाले की, मुलीचा विवाह २९ जून २०२४ रोजी ढाकणवाडी (ता. पाथर्डी)

कडक कारवाईची गरज

बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर आळा घालण्यासाठी केवळ गुन्हे दाखल करणे पुरेसे नसून जनजागृती, कठोर अंमलबजावणी आणि जबाबदार यंत्रणांवर नियंत्रण आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना पुढेही घडत राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

येथील तरुणाशी लावून देण्यात आला होता. विवाहानंतर पती-पत्नीप्रमाणे राहिल्याने ती अल्पवयातच गरोदर राहिली व १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच मातृत्व आले. या प्रकरणी पोलीस शिपाई मनीषा धाने यांच्या तक्रारीवरून मुलीचे आई-वडील, पती, सासू-सासरे, दिर व जाऊ अशा सात जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम तसेच पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा पाथर्डी पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आला.

पुढील तपासासाठी हा गुन्हा केज पोलिस ठाणे येथे वर्ग करण्यात आला असून पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके तपास करीत आहेत. बालविवाह रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात असतानाही प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. ग्रामपातळी-वरील यंत्रणा, बालकल्याण समित्या व संबंधित विभागांनी वेळेवर हस्तक्षेप केला असता, तर असे प्रकार टाळता आले असते, अशी भावना व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक

दरम्यान, बीड जिल्ह्यात अलीकडच्या काळात बालविवाहांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे वारंवार समोर येत आहे. सामाजिक बंधने, आर्थिक अडचणी आणि रूढीपरंपरांचा प्रभाव यामुळे अजूनही अल्पवयीन मुलींचे विवाह लावले जात असल्याचे वास्तव आहे. या प्रकारांमुळे केवळ कायद्याचे उल्लंघन होत नाही, तर मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अल्पवयीन मातांना प्रसूतीदरम्यान धोके वाढतात, तसेच शिक्षण खंडित होऊन त्यांच्या भवितव्यावरही परिणाम होतो.

कडक कारवाईची गरज

बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर आळा घालण्यासाठी केवळ गुन्हे दाखल करणे पुरेसे नसून जनजागृती, कठोर अंमलबजावणी आणि जबाबदार यंत्रणांवर नियंत्रण आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना पुढेही घडत राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT