Beed News : २९ लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, दोघे फरार file photo
बीड

Beed News : २९ लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, दोघे फरार

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४९ किलो गांजासह कार जप्त

पुढारी वृत्तसेवा

Cannabis worth ₹29 lakh seized; two arrested, two absconding

परळी, पुढारी वृत्तसेवाः बीड स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत परळी तालुक्यातील धर्मापुरी शिवारातून 49 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह वाहन असा ₹29 लाख 54 हजार 169 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यातील आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला धर्मापुरी परिसरातून लाल रंगाच्या कारमधून गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अहमदपूर-अंबाजोगाई मार्गावर सापळा रचला. संशयित मारुती सुझुकी ब्रेझा कारची झडती घेतली असता त्यामध्ये 49 किलो गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजासह वाहन जप्त केले. या प्रकरणी अनिल विठ्ठल फड (वय 25) व अरबाज युसुफ सय्यद (वय 23, दोघे रा. धर्मापुरी, ता. परळी) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अर्जुन रतनभाऊ फड आणि श्रीकांत भास्कर फड (दोघे रा. धर्मापुरी) यांनी गांजाची वाहतूक करण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत.

याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 327/2026 नोंदविण्यात आला असून, आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतवळे यांच्या पथकाने परळी ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT