Beed Crime: बीडमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला भररस्त्यात मारहाण Pudhari
बीड

Beed Crime: बीडमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला भररस्त्यात मारहाण

जाधव पिता- पुत्रासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बीड: बीडमध्ये निवडणुकीच्या वादातून भाजपा नगरसेविकेचे पती सागर देशपांडे यांना शुक्रवारी मध्यरात्री भररस्त्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवार भाग्यश्री देशपांडे निवडून आल्या आहेत. त्यांचे पती सागर देशपांडे हे रस्त्यावर फोनवर बोलत असताना, त्या ठिकाणी आलेल्या बाळू जाधव व यशराज जाधव यांच्यासह इतर तीन जणांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या बाळू जगन्नाथ जाधव व यशराज बाळू जाधव यांच्यासह इतर तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT