केज : दि. ९ जून रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास कळंब आगाराची केज कळंब (एम एच- ११/बी एल- ९३७५) ही कळंब गाराची एसटी बस केज कडून कळंबकडे जात असतानाच पेटली. त्यामुळे ती रस्त्यावरच जवळ जळालेल्या अवस्थेत अंधारात रस्त्यावर उभ्या होती. ही बस अचानक न दिसल्यामुळे रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास एक मोटरसायकलस्वार अचानक ताबा सुटून रस्त्यावर पडला. या मोटार सायकल क्र. (एम एच- या ४४) ए बी- ६२३४) वरून जात असलेले गणेश कल्याण हाके आणि अशोक बबन हाके हे दोघे प्रवास करीत होते.
ते दोघे रस्त्यावर मोटरसायकलसह पडले त्याच वेळी कळंब कडून केजकडे जात असलेल्या एका अवजड ट्रक क्र. (एम एच- १० /एस- ७९१६) ने मोटार सायकलला सुमारे १०० ते १५० फूट फरफट नेले. या अपघातात गणेश कल्याण हाके आणि अशोक बबन हाके हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले असता अशोक बबन हाके (दोघे रा. माळेवाडी ता. केज जि. बीड) याचा मृत्यू झाला. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज हजारे यांनी दिली.