Maratha Reservation Manoj Jarange Patil
मातोरी येथे झालेल्या दंगलीसाठी भुजबळच जबाबदार मनोज जरांगे यांचा आरोप File Photo
बीड

मातोरी येथे झालेल्या दगडफेकीसाठी भुजबळ जबाबदार : मनोज जरांगे

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील मातोरी गावात दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा, त्यांनीच लोकांना दगडफेक करायला सांगितले असावे. भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे. असे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मातोरी गावात झालेल्या दगडफेकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.

शुक्रवारी (दि.28) रात्री जो प्रकार घडला, तो शंभर टक्के छगन भुजबळ यांनीच करायला लावला अशी मला शंका आहे. अंतरवालीत आंदोलन सुरू असताना वडीगोद्री येथेच आंदोलन का व कुणी करायला लावलं? एल्गार सभा सुद्धा अंबड मधूनच सुरू केली होती. प्रति सभा घेतली मग हा जातीवादी नाहीतर काय आहे? असे प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे मनसुबे पुर्ण होऊ देणार नाही. या वेळी बोलताना जरांगे म्हणाले, हल्ला घडवायला माझच गाव सापडलं का? छगन भुजबळला मुद्दाम वाटेत समाजात तेढ निर्माण व्हावे. ही त्याची सवयच आहे. त्यांच्या आंदोलन करायला विरोध नाही पण आमच्या अंतरवालीच्या समोरच कोणत्या हेतूने आंदोलन ठेवले होते.

आंतरवाली सराटीत आंदोलन सुरू असताना त्यांची इच्छा असूनही मी दंगल होऊ दिली नाही. मला अशी शक्यता दिसते की तिकडे जाऊन गाड्या फोडायला लावायाचे भुजबळ यांनी सांगितले आपल्या गाड्या फोडून टाका. त्या गोरगरीबांवर आरोप घाला. मी बिडच्या पालकमंत्र्यांना सांगतो की, माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. मला बदनाम करण्यासाठी छगन भुजबळ ह्यांनी ही शाळा केल्याची मला शक्यता वाटते.छगन भुजबळच ऐकून माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास होऊ देऊ नका नाहीतर महाराष्ट्रातला मराठ्यांचा नाईलाज होईल असेही जरांगे पाटील म्हणाले.

SCROLL FOR NEXT