Container Hits Vehicles in Kage Beed Accident News
केज : केज येथे एका नशेच्या अंमलाखाली भरधाव वेगाने कंटेनर चालवून एका महिलेच्या मृत्यू आणि २० जणांपेक्षा जास्त लोकांना जखमी करून रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक देवून अनेक वाहनांचे नुकसान केल्या प्रकरणी कंटेनरचा चालक आणि गुजरातमधील कंटेनरचा मालक या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि.१६) दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास एका मद्यधुंद कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर (डीडी ०१/झेड ९७७१) ने केज मध्ये जोराची धडक दिली. या अपघातात मीना प्रवीण घोडके (रा. टाकळी, ता. केज) हिचा जागीच मृत्यू झाला. तर याच रस्त्यावर त्या कंटेनर चालकाने अनेक रिक्षा, मोटार सायकल आणि कार यांना धडक दिल्याने त्यात १) अतुल बाबुराव कुलकर्णी (वय ३७ रा. तांबवा ता. केज, सध्या रा. शिक्षक कॉलनी केज), २) सिद्धेश्वर वसुदेव कापरे (वय २७, रा. युसुफवडगाव ता. केज), ३) सिद्धार्थ शिंदे ( वय २७, नेमणूक पोलीस अंमलदार पोलीस ठाणे, युसुफवडगाव), ४) आशा रावसाहेब मुंडे (वय ५० , रा. चारदरी, ता .धारूर), ५) विलास वसुदेव कापरे (वय २३ रा. कापरेवाडी, ता. केज), ६) इरशाद बाबु शेख (वय २४, रा. केज), ७) शरद व्यंकट सावंत (वय ४५, रा. धारुर), ८) कृष्णा हरीदास कापरे (वय २०, रा. कापरेवाडी ता. केज), ९) श्रद्धा मधुकर चिंचकर (वय १८, रा. येवता ता. केज), १९) सुनिल सुंदरराव घुले (वय ५९, रा. केळगाव, ता.केज), ११) बळीराम अप्पाराव पांचाळ (वय ४९ रा. ढाकेफळ, ता. केज), १२) सोनु बाबु शेख (वय २०, रा. केज), १३) विलास वसुदेव काकडे (वय २२, रा. कापरेवाडी, ता. केज), १४) कुमार गायकवाड (वय ३५ रा. देवगाव, ता. केज), १५) शेषेराव मारुती चंदनशिव (वय ३५, रा. शिरपुरा ता. केज), १६) सरिता रावसाहेब मुंडे (वय ३७, रा. चारदरीता धारूर), १७) फुलाबाई धोंडीराम सावंत (वय ६९, रा. सुगाव, ता. अंबाजोगाई), १८) रावसाहेब यादवराव मुंडे (वय ७०, रा. चारदरी ता. धारूर), १९) विद्या विलासराव सुर्यवंशी (वय ३०, रा. पिसेगाव, ता. केज), २०) विलासराव ज्ञानोबा सुर्यवंशी (वय ३०, रा. पिसेगाव, ता. केज) यांचा समावेश आहे.
दरम्यान, अपघातातील मृत महिला मीना प्रवीण घोडके यांचे दीर सचिन घोडके यांच्या तक्रारीवरून कंटेनर चालक मुजफर युसुफ सय्यद (रा. पंचवटी लातुर ता. जि.लातुर) आणि कंटेनरचा मालक रोहित विजेंद्र शर्मा (रा. वापी, गुजरात) यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कंटेनर चालक हा अपघाता नंतर कंटेनर २५ कि.मी. अंतरावर पलटी झाल्याने किरकोळ जखमी झाला होता. तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्याला सुट्टी होताच पोलीस त्याला अटक करणार असल्याची विश्वासनीय माहिती आहे.
पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहे.