Beed Crime file photo
बीड

Beed Crime: गल्लीतील मित्रांसोबत वाद; नंतर सपासप वार करून तरुणाचा खून

धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून एका तरुणाचा खून झाल्याची घटना शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली.

पुढारी वृत्तसेवा

Beed Crime

बीड : धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून एका तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. सदर घटनेनंतर जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती.

बीड शहरातील स्वराज्य नगर भागातील विजय सुनील काळे (वय 25) या तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत विजय काळे याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सदर घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली असून गल्लीतीलच मित्रांसोबत काही कारणावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT