केज : तालुक्यातील कोरेगाव येथे अंगणात काम करत असताना अंगावर वीज पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. तापशिला बाळासाहेब दराडे (वय ४०) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, केज तालुक्यातील कोरेगाव येथे घरासमोरील अंगणात तापशिला दराडे ही महिला शुक्रवारी सायंकाळी धान्य पाकडण्याचे काम करत होती. यादरम्यान पाऊस सुरू असल्याने विजेचा कडकडाट होऊन अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या पश्चात पती, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.