बीड : बीड जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी आणि भ्रष्ट कार्यभार या बाबत दररोज नवनवीन उद्योग समोर येत आहे. वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील राजेसाहेब विद्यालय येथील शाळेतील विद्यार्थी हे चक्क छ. संभाजीनगर येथील शाळेला विकल्याचा प्रकार समोर आला असून या बाबत शिक्षण विभाग खडबडून जागे झाले आहे.
या शाळेची तसेच असा प्रकार ज्या ज्या ठिकाणी झाला आहे त्या सर्व शाळेची तपासणी ही विशेष अधिकाऱ्या मार्फत करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधीकारी जयश्री चव्हाण यांनी दैनिक पुढरीशी बोलताना सांगितले.
बीड जिल्ह्यातील शिक्षण विभागात अलीकडच्या काळात दररोज नवनवीन घोटाळे समोर येत आहे. खाजगी शाळा मधून तर दररोज नवनवीन प्रताप समोर येत आहे. आता तर चक्क शाळेचे विद्यार्थी हे संस्थाचालक आपली मालमत्ता असल्या सारखे दुसऱ्या खाजगी संसतहेस विकत आहे. वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील राजेसाहेब विद्यालयातील जवळपास पन्नास विद्यार्थ्यांची प्रती विद्यार्थी दहा हजार ते तीस हजार रुपया पर्यन्त कागदपत्रासह विक्री करण्यात आली असून या बाबतची सविस्तर माहिती शाळेच्या मुख्य नोटिस बोर्ड तसेच इतर भिंती दरवाजा यावर डकविण्यात आली आहे.
दरम्यान या बाबत शिक्षण विभागातील माध्यमिक शिक्षणाधीकारी प्रियाराणी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असतं नेहमी प्रमाणे त्यांचा फोन हा कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याचे दिसून आले त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता त्यांनी प्राथमिक शिक्षणाधीकारी जयश्री चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले, त्यावर चव्हाण यांनी याबाबत सखोल चौकशी करून शूरकवर पर्यन्त अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
बीड जिल्ह्यात खाजगी शिक्षण संस्थेत सध्या मोठ्या प्रमाणावर घोटाळे हे समोर येत असताना संस्थाचालकाचे घोटाळे दडपविण्याचे काम शिक्षण विभागातील काही कर्मचारी 'नाना' उद्योग करणाऱ्या शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापकाच्या माध्यमातून करत असून या मुख्याध्यापकाने आतापर्यंत खाजगी संस्थेतील दोन शिक्षकांचे बळी घेतल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात होत आहे.