मृतदेह  File Photo
बीड

Beed Crime : केजमध्ये जुन्या सरकारी दवाखान्याजवळ आढळला अनोळखी युवकाचा मृतदेह

पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

केज : केज येथील मेन रोड लगत असलेल्या जुन्या सरकारी दवाखान्याच्या परिसरात रस्त्याच्या कडेला एका ३० ते ३५ वर्षे वयाच्या तरुणाचा अनोळखी मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी (दि. १२) सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस अंमलदार शिवाजी कागदे, बाबजी दराडे आणि बजरंग मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवला. १०८ रुग्णवाहिकेचे पायलट मकरंद घुले आणि डॉ. सूर्यवंशी यांनी सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृतदेह शवागारात ठेवला आहे.

सदर मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीबाबत काहीही माहिती अथवा ओळख पटल्यास नागरिकांनी तात्काळ केज पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT