केज : गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना मंदिरात गाणे का वाजवू देत नाही म्हणून शिवीगाळ करून डोक्यात दगड घालुन एकाला जखमी केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सावळेश्वर (पैठण) येथील महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असताना तेथे ऋषीकेश गणेश मस्के, वय (२८ ) हा उभा होता. त्यावेळी दत्तात्रय विनायक मस्के हा तेथे आला व ऋषिकेश याला म्हणाला की, "तु मला मंदिरात गाणे का वाजवु देत नाहीस ? " असे म्हणत शिवीगाळ केली. तेव्हा ऋषिकेश त्याला म्हणाला की, शिव्या का देतोस ? असे म्हणताच दत्तात्रय मस्के याने ऋषिकेश याला लाथा- बुक्क्यांनी मारहाण करुन त्याने हातातील दगड डोक्यात घालत ऋषेकेश याला जखमी केले.
या प्रकरणी ऋषिकेश मस्के याने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून दत्तात्रय म्हस्के याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सत्यपाल कांबळे हे तपास करीत आहेत.