Beed SP Navneet Kawth vehicle accident
केज : केज येथे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या गाडीचा अपघात झाला. ही घटना शनिवारी (दि.२९) पहाटे ३ ते ३.३० च्या सुमारास घडली . सुदैवाने यात कोणलाही दुखापत झाली नाही. सर्वजण सुखरूप आहेत.
या बाबतची पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की, २८ नोव्हेंबर रात्री परळीच्या विद्यानगर भागात गोळीबार झाल्यामुळे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे तातडीने परळीला रवाना झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे रात्री उशिरा परळीवरून बीडकडे परत जात होते. यावेळी पहाटे ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास केज येथील धारूर चौकात त्यांची सरकारी गाडी दुभाजकाला धडकून त्यावरील विजेच्या खांबाला धडकली.
या अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले . तर कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या सोबत गणेश थापाडे, चालक रहेकवाल आणि क्यूआरटीचे पथक सोबत होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे तत्काळ अपघातस्थळी हजर झाले. त्यांनी दुसऱ्या वाहनातून नवनीत काँवत यांना बीडकडे रवाना केले.