दुसरीत शिकणाऱ्या बालिकेवर वारंवार लैगिंक अत्याचार Pudhari File Photo
बीड

Beed Crime : दुसरीत शिकणाऱ्या बालिकेवर वारंवार लैगिंक अत्याचार; जाब विचारणाऱ्या आईलाही बेदम मारहाण

'पोक्सो' अंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

केज : केज तालुक्यातील एका गावात दुसरीत शिकणाऱ्या बालिकेवर दोघांनी वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयितांच्या नातेवाईकांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडेगाव (ता. केज) येथील वैभव विष्णू अंबाड आणि मयुर चंद्रकांत अंबाड या दोन नराधमांनी १ मे २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या बालिकेला घरी बोलवून तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीची आई आरोपींच्या घरी जाब विचारण्यास गेली असता आरोपींचे नातेवाईक लक्ष्मण नरसु अंबाड, चंद्रकांत लक्ष्मण अंबाड (रा. लाडेगाव ता. केज जि. बीड) या दोघांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली. २१ ऑगस्ट रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वैभव आंबड, मयूर आंबड, लक्ष्मण आंबड, चंद्रकांत आंबड या चौघां विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात अत्याचार व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT