केज : शाळेतून घरी येत असताना पाणी साठलेल्या डबक्यात पाय घसरून पडल्याने १० वर्षाच्या शाळकरी मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अर्णव शांतीलाल ठोंबरे असे या मुलाचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२७) घडली.
याबाबत अधिक माहिती अशी. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील अर्णव ठोंबरे हा शाळकरी विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर शनिवारी त्यांच्या शेतातील घराकडे पायवाटेने जात होते. त्यावेळी शेतरस्त्याच्या कडेला पाणी साठलेल्या मोठ्या डबक्यात अर्णव पाय घसरून पडला. जवळ कोणी नसल्याने त्या खड्ड्यातील पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अपघाती आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.