बीड, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पुण्यातून बीड पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती त्यानंतर 26 दिवस हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या दोघांना 14 दिवसाचे पोलीस फुटली सूनावण्यात आली.
केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे फरार होते. यातील सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गेले 26 दिवस ते फरार होते.. त्यांच्या मागावर बीड पोलिसांचे पथक होते परंतु ते हाती येत नसल्याने पोलिसांवरील दबाव वाढतच होता यादरम्यान रात्री एका डॉक्टरची तीन ते चार तास कसून चौकशी करण्यात आली.. त्यानंतर या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. (Santosh Deshmukh Murder Case)
या दोन्ही आरोपींना प्रारंभी नेकनूर पोलीस ठाणे येथे आनंद त्यांची चौकशी करण्यात आली त्यानंतर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून हजर करण्यात आले त्या ठिकाणी अटकेची कार्यवाही करत त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयासमोर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी यांना सुनावली आहे. (Santosh Deshmukh Murder Case)
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी होते आता त्यामध्ये आणखी एकाची वाढ झाली आहे. 9 डिसेंबर रोजी संतोषी देशमुख हे कोठे आहेत ? कोठे जाणार आहेत ? याबाबतचे सर्व लोकेशन सिद्धार्थ सोनवणे सुदर्शन घुले यांच्यासह इतर आरोपींना देत होता असे तपासात समोर आले होते त्यामुळे त्याच्या देखील मागावर पोलीस होते यादरम्यान तो कल्याण येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला देखील कल्याण मधून अटक करण्यात आली सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांच्याबरोबरच त्याला न्यायालयात हजर केल्यास न्यायालयाने त्याला देखील 18 जानेवारीपर्यंत म्हणजेच 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.