संतोष देशमुख यांना मारहाण केलेल्या हत्याराचे रेखाटन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रातून न्यायालयासमोर सादर केले.  Pudhari Photo
बीड

कौर्याची परिसीमा! संतोष देशमुख यांच्या अंगावर १५० व्रण; क्लच वायर बांधलेल्या लोखंडी पाईपने मारहाण

Santosh Deshmukh Murder Case | गॅसच्या पाईपला वळवून तयार केली होती मूठ

पुढारी वृत्तसेवा

बीड; पुढारी वृत्तसेवा : संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकरिता सुदर्शन घुले याच्या साथीदाराने वेगळीच हत्यारे वापरली. या हत्याराचे रेखाटन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रातून न्यायालयासमोर सादर केले आहे. (Santosh Deshmukh Murder Case)

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबररोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. देशमुख यांचा मृतदेह ज्यावेळी आढळून आला. त्यावेळी मृतदेहावर दीडशेहून अधिक लहान, मोठे व्रण असल्याचे समोर आले होते. बेदम मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अमानुष पद्धतीने क्लच वायर, गॅस पाईप, लोखंडी पाईप तसेच पीव्हीसी पाईपने संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर हे व्रण उमटल्याने संपूर्ण त्वचा काळी निळी पडली होती. (Santosh Deshmukh Murder Case)

सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी हे वेगळेच प्रकारचे हत्यार तयार केले होते. त्या हत्याराच्या माध्यमातून देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. ही हत्यारे नेमकी कशा पद्धतीची होती. याचे रेखाटन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी तयार करून न्यायालयात सादर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT