minor girl Rape Case file photo
बीड

Beed Rape Case | १६ वर्षीय मुलीवर दोघांकडून पाशवी अत्याचार; आरोपींविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

तालुक्यातील धारावती तांडा परिसरातील संतपाजनक घटना, परळी ग्रामीण पोलीसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : परळी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील धारावती तांडा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बहाण्याने बोलावून केला अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीला एका बहाण्याने घरात बोलावून घेतले. मुलगी घरात येताच नराधमांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी पीडितेला दिली.

गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. परळी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT