आष्टीत अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई 
बीड

Beed Crime : आष्टीत अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई

प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांच्या नेतृत्वात धडक मोहीम

पुढारी वृत्तसेवा

कडा : आष्टी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक भारत पांढरे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. तालुक्यात ठीकठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत देशी-विदेशी दारूची विक्री तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

उपअधिक्षक भारत पांढरे यांना मिळालेल्या माहितीनुसार,त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने विनापरवाना व बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली.यामध्ये सादिक शेख, बाळू साहेबराव वाघमारे, पंकज रघुनाथ साळवे, बाबासाहेब गंगाराम शिंदे व हरिभाऊ श्रीपती अनारसे यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चोभा येथील निमगाव शिवारातील कडा-मिरजगाव रस्त्यालगत असलेल्या हॉटेल काळेश्वरी येथे देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ५ हजार १०० रुपयांची देशी- विदेशी दारू जप्त करण्यात आली.

याप्रकरणी सुरज सुभाष मुरकुटे (रा.चोभा निमगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नांदा शिवरात्री येथील हॉटेल रानवारामध्येही अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू आढळून आली. याप्रकरणी ११ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राजेंद्र महादेव काळे (रा.फत्ते वडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मांडवा येथील विराज किरणा दुकानामध्ये बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री होत असताना पोलिसांनी कारवाई केली. पोलिस अंमलदार पांढरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सचिन नवनाथ मुटकूळे (रा.मांडवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे व पोलीस ठाणे आष्टीचे प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वाघमारे, पोहेकॉ. सवासे, पोहेकॉ.नवले, पोहेकॉ.मुंडे, पोकॉ. सजगणे, पोकॉ.शेख, पोकॉ.पाखरे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT