Beed Police | 'त्या' लुटारू ऑटोवाल्याला पकडले ; परळी पोलिसांची तत्परता: वृद्ध महिला लूटप्रकरणातील पती-पत्नीला २४ तासांत अटक 
बीड

Beed Police | 'त्या' लुटारू ऑटोवाल्याला पकडले ; परळी पोलिसांची तत्परता: वृद्ध महिला लूटप्रकरणातील पती-पत्नीला २४ तासांत अटक

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथः अंबलवाडी घाट परिसरात एका महिलेला लुटणाऱ्या रिक्षाचालक पती-पत्नीला परळी शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.

२२ मार्च २०२६ रोजी पीडित महिलेला ऑटोमध्ये लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.

तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत, २४ मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोज उर्फ सायस केद्रे (वय २८) आणि त्याची पत्नी वैष्णवी मुडे (वय २०, रा. फावडेवाडी, ता. रेणापूर) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेला ऑटोदेखील पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पीएसआय अमोल शिंगणे, अंमलदार खताळ, पंडित पांचाळ, प्रशांत शेळके आणि शुभम घुले यांच्या पथकाने सहभाग घेतला. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT