Pudhari File Photo
बीड

बीड : पिंपरी घुमरी येथील घटनेतील आणखीन तीन जण आरोपी जेरबंद

Beed Crime |सामाजिक संघटनांकडून तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

कडा : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच शनिवारी आष्टी तालुक्यात पिंपरी घुमरी ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ट्रक मालकाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ट्रकचालक विकास अण्णा बनसोडे (२३, रा. बोरगाव, ता. भोकरदन, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे तीन वर्षांपासून विकास ट्रकचालक होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढले होते. विकास हा पिंपरी गावात मित्रासह दोन दिवसांपूर्वी आला होता. विकास व भाऊसाहेब यांच्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आरोपींनी दोरी व वायरच्या साहाय्याने विकासला मारहाण केली होती. मृताचा भाऊ आकाश आण्णा बनसोडे यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपींमध्ये दहा जणांचा समावेश

भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भानुदास क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर (रा. पिंपरी घुमरी), संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे,बापूराव शिंदे यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

सहा आरोपींना अटक

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भाऊसाहेब क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर यांना अटक केली होती तर. आज पोलिसांनी संकेत भाऊसाहेब क्षिरसागर, संजय भवर, सुशांत शिंद असे तीन जणांना अटक केली आहे इतर चार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विविध सामाजिक संघटना चे तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन

आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसात विविध दोन घटना घडल्या आहेत त्यात जामगाव येथील धनु रणसिंग व पिंपरी घुमरी येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या विकास बनसोडे या दलित तरुणांची अमानुषरित्या हत्या करण्यात आली त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा किंवा त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आष्टी तालुक्यातील दलित संघटनांनी तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन घेऊन आपला रोष व्यक्त केला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT