Crime News Pudhari
बीड

Parli Crime | "तू माझ्याशी का बोलत नाहीस?" अल्पवयीन मुलीवर घरात घुसून विळ्याने जीवघेणा हल्ला

पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा, आरोपी फरार

पुढारी वृत्तसेवा

Parli Minor Girl Attack

परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील दादाहरी वाडगाव येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून विळ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश राम खाटीक (रा. दादाहरी वाडगाव) हा पीडित मुलीच्या घरात घुसला. त्यानंतर दरवाजाला आतून कडी लावत, "तू माझ्याशी का बोलत नाहीस?" असे म्हणत त्याने मुलीला खाली पाडले. तिच्या अंगावर बसून दोन्ही हातांनी गळा दाबला. त्यानंतर हातातील विळ्याने तिच्या डाव्या खांद्यावर वार करून तिला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी आकाश राम खाटीक याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ७५(१), ७६, ७८, १२७(२), ३३३, ३५१(२), ३५२ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पिंक पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेंडगे करत असून, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT