Viral video of Pankaja Munde
परळी वैजनाथ : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हीडीओ तयार करुन व्हायरल केल्याप्रकरणी सिरसाळा येथे एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, सिरसाळा येथील आरोपी मतिन मणियार याने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा भाषणाचा व्हिडिओ व त्यामध्ये चारही कोपर्यात अश्लील फोटो लावून तो व्हिडिओ 'ग्रामपंचायत सिरसाळा' या वाॅटस्अँप ग्रुपमध्ये प्रसारी केला.
याप्रकरणी नसीब रहीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि उस्मान शेख पो. स्टे. सायबर बीड हे करीत आहेत.