अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाला. File photo
बीड

बीड : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

हनुमंत पिंपरीजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

केज : पायी चालत निघालेल्या वृद्धाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच झाला. ही घटना मंगळवारी (दि.२१) पहाटे मस्साजोग येथील हनुमंत पिंपरीजवळ घडली. रामभाऊ शामराव दातार (वय ७०) असे या वृद्धाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, मंगळवारी दिनांक २१ जानेवारी रोजी पहाटे ५:०० वा सुमारास केज तालुक्यातील बेलगाव येथील रामभाऊ दातार हे आज (मंगळवारी) पहाटे हनुमंत पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही पायावरून वाहन गेल्याने दातार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड आणि मस्साजोग बिटचे जमादार चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT