बीड

Beed News : मांजरसुंबा घाटातील चढावर ऑईल सांडल्याने वाहनांची घसरगुंडी, दुचाकीचालक थोडक्यात बचावले

ट्रकचीही झाली दमछाक; वाहतूकीची कोंडी

पुढारी वृत्तसेवा

बीड : सोलापूर-धुळे महामार्गावरील मांजरसुंबा घाटात बीडकडून सोलापूरकडे जाणाऱ्या टँकरमधील ऑईल सांडल्याने मोठा गोंधळ उडाला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकाराने या ऑईलवरुन गाडी गेल्यानंतर दुचाकीचे अपघात होता होता राहिले तर दुसरीकडे टायरला ग्रीप मिळत नसल्याने ट्रकचालक हैराण झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल होत वाहतूक थांबवत उपाययोजना केल्यानंतर तासाभराने वाहतूक सुरळीत झाली.

सोलापूर-धुळे महामार्गावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बीडकडून सोलापूरकडे जाणाऱ्या एका टँकरमधील ऑईल सांडल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. या ऑईलमुळे रस्ता निसरडा बनल्याने काही दुचाकीचालक स्लीप झाले, परंतु ते थोडक्यात बचावले. तर दुसरीकडे अवजड वाहतूक करणारी वाहनांच्या टायरला या ऑईलमुळे ग्रीप मिळत नव्हती, परिणामी चढावरुन गाडी चालवतांना ट्रकचालकही हैराण झाले.

या सर्व प्रकाराबाबतची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिसचे एपीआय ढगारे, सहाय्यक फौजदार तात्यासाहेब बांगर, विकास सदगर, सुनील बांगर, मुकुंद बागलाने, गंगावणे, सुरज मुंडे यांनी त्या ठिकाणी दाखल होत वाहतूक थांबवली तसेच आयआरबीच्या मदतीने सांडलेल्या ऑईलवर माती टाकल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. जवळपास तासभर चाललेल्या या प्रकारामुळे वाहनांच्या रांगांच रांगा लागल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT