Beed News | विहिरीमध्ये आडवे बोर घेताना दोन मजुरांचा मृत्यू; एक जखमी 
बीड

Beed News | विहिरीमध्ये आडवे बोर घेताना दोन मजुरांचा मृत्यू; एक जखमी

बोरींग मशिनचा झुला तुटल्याने झाला अपघात

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव - तालुक्यातील खरात आडगाव येथील जय महेश शुगर इंडस्ट्रीजच्या विहिरीचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जय महेश शुगर इंडस्ट्रीजच्या विहिरीमध्ये आडवे बोर घेण्यासाठी बोरिंग मशीन आणण्यात आली होती. बोरिंग मशीनच्या झुल्याचे काम सुरू असताना अचानक झुला तुटून थेट विहिरीमध्ये कोसळला. या दुर्घटनेत जशवंत मीना (वय 26, रा. चित्ताखेडी, मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आणखी एका मजुराचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप समजू शकलेली नाही.

या अपघातात रविराज सिंग (वय 18, रा. मंदसोर, मध्यप्रदेश) हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका मजुराचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून दुसऱ्या मजुराचा मृतदेह विहिरीमध्ये अडकला असल्याने शोधकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT