घटनेची माहिती कळताच संतप्त युवकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.  
बीड

Beed News | पोहनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अश्लाघ्य कृत्य; तरुणास अटक!

सिरसाळा पोलिसांची कारवाई; घटनेनंतर संतप्त युवकांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : तालुक्यातील पोहनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागील भिंतीजवळ अश्लाघ्य कृत्य करून भावना दुखावल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर गावातील युवक आणि शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त युवकांनी सिरसाळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पोहनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थ उपस्थित असताना आरोपी शोएब मौकीद सौदागर हा टिप्पर घेऊन तेथे आला. वाहन रस्त्यावर उभे करून त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्याजवळ लघुशंका केल्याचा आरोप आहे.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिक आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ काही युवकांनी सिरसाळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. संबंधितावर तातडीने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पोहनेर येथील रहिवासी मोहन रमेश काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शोएब मौकीद सौदागर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक २४९/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, पोलिसांनी कारवाई केल्यानंतर गावातील परिस्थिती नियंत्रणात असून शांतता कायम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT