Beed News | माजलगावात २०० हून अधिक गोवंश हत्या प्रकरणात गुन्हा दाखल : दोघांना अटक 
बीड

Beed News | माजलगावात २०० हून अधिक गोवंश हत्या प्रकरणात गुन्हा दाखल : दोघांना अटक

सामाजिक संघटनांनी आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : माजलगाव शहरात बकरी ईदच्या दिवशी २०० हून अधिक गोवंशांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या झाल्याची माहिती विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून व बकरी ईदच्या पहिल्या दिवशी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लोकेशन पाठवूनही यावर काहीच कारवाई केली नाही असा आरोप केला जाऊ लागला होता. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी पोलिसांना याबाबत निवेदन दिल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट व घटनेचा पंचनामा करून रात्री गोष्टीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जफर गफर कुरेशी (वय २५) व इम्रान शकील कुरेशी (वय ३३) रा . खाटीक गल्ली माजलगाव यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत

आंदोलनाचा इशारा देताच पोलिसांना आली जाग

शहर पोलिसांना लोकेशन देऊनही एवढ्या गाईंची कत्तल झालेली असताना येथील शहर पोलिसांनी याची साधी दखलही घेतली नव्हती. या विरोधात काही सामाजिक संघटनांनी आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता यानंतर पोलिसांना जाग आली व पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT