Beed News | केज तालुक्यात बोबडेवाडी येथील दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने घेतला टोकाचा निर्णय! 
बीड

Beed News | केज तालुक्यात बोबडेवाडी येथील दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने घेतला टोकाचा निर्णय!

कारण अस्पष्ट : केज येथील शाळेत घेत होता शिक्षण

पुढारी वृत्तसेवा

केज :- केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील आकाश नितीन बोबडे हा १६ वर्ष वयाचा विद्यार्थी हा गोटेगाव ता. केज येथील सम्राट अशोक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आकाश नितीन बोबडे या विद्यार्थ्याने दि. २१ सप्टेंबर, सोमवार रोजी रोजी त्यांचे आई-वडील घरी नसताना बोबडेवाडी येथील त्याच्या राहत्या घरात भिंतीला खिळा ठोकून नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी ४:३० च्या सुमारास उघडकीस आली.

आत्महत्येची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे सय्य्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, पोलिस हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे, मुंडे यांनी आकाश बोबडे याचा मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट समजलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT