Beed News: Good response to the agricultural exhibition in Gevrai
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई येथे सुरु असलेल्या पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला चौथ्या दिवशीही शेतकरी, युवक व नागरिकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. रविवारपर्यंत या कृषी प्रदर्शनाला तब्बल ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट देत आधुनिक शेतीविषयक माहिती, नव्या संकल्पना व तंत्रज्ञानाची माहिती घेतली आहे.
दरम्यान आज ११ प्रयोगशील शेतकऱ्यांचा कृषीरत्न पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात येणार आहे, यानंतर कृषी प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून, हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक, ज्ञानवर्धक व दिशादर्शक ठरत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, लघु व मध्यम शेतकरी, युवक व महिला शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून या प्रदर्शनाची रचना करण्यात आली आहे. यंदाच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या २२० हून अधिक नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
या स्टॉल्सवर आधुनिक शेती यंत्रसामग्री ट्रॅक्टर व अवजारे, उच्च प्रतीची बी-बियाणे, खते व कीडनाशके ड्रिप व स्प्रिंकलर सिंचन प्रणाली, सोलर पंप शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन यांची सविस्तर माहिती किसान कृषी प्रतिष्ठानच्या वतीने गेवराई येथे गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने या राज्यस्तरीय कृषी शेतकऱ्यांना दिली जात आहे.