जिल्हा परिषद शाळा AI File Photo
बीड

Beed News : पगार घाटेवाडीत, काम दुसऱ्या शाळेत! संतप्त गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप

केजमधील घाटेवाडीतील झेडपीच्या शाळेला चार दिवसांपासून कुलूप

पुढारी वृत्तसेवा

केज : घाटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कार्यरत शिक्षक दुसऱ्या शाळेवर कार्यरत असल्याने त्या शिक्षकासाठी ग्रामस्थांनी मागील तीन दिवसांपासून शाळा बंद ठेवली आहे.

घाटेवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून संचमान्यतेनुसार सहा शिक्षकाची पदे मंजूर आहेत. सध्या शाळेवर एक मुख्याध्यापक आणि चार शिक्षक कार्यरत आहेत. तर शाळेत १३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका रिक्त शिक्षकाचे पद भरले. त्या शिक्षकाचा पगार या शाळेतून काढला जात असताना तो शिक्षक दुसऱ्या शाळेवर कामकाज करीत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद शिंदे व गावकऱ्यांनी या शिक्षकास शाळेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळा भरण्यापूर्वी केली होती.

मात्र, शिक्षण विभागाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत शिक्षकास शाळेवर पाठविले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या पालकांनी सदरील शिक्षक शाळेवर पाठवा, अन्यथा आमच्या मुलांचे टीसी आम्हाला द्या, अशी मागणी लावून धरल्याने पहिल्या दिवसांपासून शाळा भरली नसून शाळेला कुलूप आहे. दरम्यान, चार दिवसांपासून शाळा बंद असताना शिक्षण विभागाचे अधिकारी फिरकले देखील नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT