Gold Theft 
बीड

Beed theft news | राम कथा ऐकून घरी परतणाऱ्या तलाठी महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविले

रामायणाचार्य ह.भ. रामराव महाराज ढोक यांच्या कार्यक्रमातून परतताना ही घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : रामायणाचार्य ह.भ. रामराव महाराज ढोक यांची रामकथा श्रवण करून घरी परत येणाऱ्या तलाठी महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण चोरट्यांनी लांबविलेल्याची घटना घडली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज येथे. भागवत भूषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांच्या श्रीकृष्ण आश्रमात, श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन व भव्य अशा महाविष्णू यज्ञ निमित्त १०८ महाचंडी यज्ञ आयोजित केला आहे. त्या निमित्त ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची संगीत रामकथा आयोजित केली आहे. या कार्यक्रमाला अनेक ठिकाणाहून भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.

दरम्यान दि. १३ मार्च रोजी केज येथे राहत असलेल्या तलाठी महिला आशा विजयसिंह काकडे वय वय, (३६ वर्ष) या रामराव महाराज ढोक यांची कथा ऐकून सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास घरी परत जात असताना त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मिनी गंठण अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.

आज शनिवारी (दि.१४) त्या मिनी गंठणची किंमत सुमारे पावणे तीन लाख रु. च्या आसपास आहे. याप्रकरणी तलाठी श्रीमती आशा काकडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. १२९/२०२६ नुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध ३०३(२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT