गौतम बचुटे
केज :- लहान मुलगी धरणाच्या पाण्यात बुडत असताना तिला वाचवायला गेलेल्या तरुण पित्याचा दुर्दैवी अंत झाल्या नंतर उघड्या पडलेल्या कुटुंबाची व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घालून निवेदनाद्वारे मदतीचे मागणी करण्यासाठी गेलेल्या आजोबांचा तीव्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना केज शहरात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याची माहिती मिळताच डॉ. शिंदे यांनी सय्यद कुटूंबाची भेट घेऊन आर्थीक मदतिचे आश्वासन दिले.
या बाबतची माहिती अशी की, दि. १० मे रोजी केज येथील रसूल गफूर सय्यद यांची नात अप्शा सय्यद ही धनेगाव येथील मांजरा प्रकल्प पहाण्यासाठी गेली असताना तिचा पाय घसरून पाण्यात पडली. यामुळे स्वतः पोहायला येत नसताना देखील मुलीला वाचविण्यासाठी कोणताही विचार न करता मुलीचे वडील अहेमद रसूल सय्यद हा पाण्यात उतरला आणि त्याने मुलीला वाचविले; परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने अहेमद सय्यद गाळात फसल्याने त्याला वर न येता आले नाही. व त्याचा दुर्दैवी अंत झाला होता.
या धक्क्यातून त्याचे कुटुंब सावरले नसताना दि. २९ मे रोजी शिवसेनेच्या शिवसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते ना. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भरत गोगावले आणि शिवसेनेचे नेते हे केज येथे आले होते. यावेळी त्यांना भेटून दिवंगत अहेमद सय्यद यांच्या कुटुंबाला आपत्कालीन योजने अंतर्गत मदत मिळावी म्हणून निवेदन देण्यासाठी अहेमद याची पत्नी, मुले आणि वडील रसूल सय्यद गेले होते.
दरम्यान प्रचंड ऊन आणि गर्दी याच्या मुळे सय्यद अहमद यांना दरदरून घाम फुटला आणि घबराट झाल्यासारखे वाटत असल्याने कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांनी जवळचा असलेल्या डॉ. बालासाहेब अस्वले यांच्या विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. मात्र दवाखान्यात घेऊन जाण्या पूर्वीच रसूल सय्यद त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे केज शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
घरातील दोन्ही कर्ते पुरुष गेले
दिनांक १० मे रोजी मुलीला वाचविताना अहेमद सय्यद याचा मृत्यु झाला तर त्याचे कुटुंब उघडे पडल्याच्या ताण तणावातून त्याचे वडील रसूल सय्यद यांची दि. २९ मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने प्राण सोडल्याने आता त्यांचे सर्व कुटुंब उघड्यावर पडले आहे. अवघ्या १८ व्या दिवशीच सोडला वडिलांनी प्राण सोडल्याची घटना घडली आहे.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले सय्यद परिवाराचे सांत्वन !
दरम्यान मेळाव्यासाठी आलेले शिवसेनेचे नेते खा. श्रीकांत शिंदे यांनी सय्यद रसूल यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्याच्या कुटुंबांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.