बीड

अल्टीमेटम् संपताच अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू

Anti-Encroachment Drive Beed | अनेकांनी स्वतःच अतिक्रमणे हटविले

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : केज येथील महामार्ग आणि शासकीय कार्यालयाला पडलेला अतिक्रमणाचा विळखा हटविण्याची प्रशासनाने दिलेला अल्टीमेटम् संपला आहे. दरम्यान आज सकाळी ९:०० वा पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. तर अनेकांनी रात्रीच नुकसान टाळण्यासाठी आपल्या टपऱ्या आणि डब्बे काढून घेतले.

आज (दि. १२) मे रोजी केज शहरातुन जाणारे महामार्ग, रस्ते व शासकीय कार्यालयाच्या चोहोबाजुंनी झालेल्या अतिक्रमणावर प्रशासकीय हातोडा पडणार आहे. प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण धारकांना त्यांची अतिक्रमणे स्वतः काढून घेण्यासाठी ११ मे पर्यंत मुदत दिली होती. ती मुदत संपण्यापुर्वीच दि. ११ मे रोजी रात्री अनेकांनी रस्त्यावर असलेलीआणि शासकीय कार्यालयाच्या परिसरातील अतिक्रमणे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. आज सकाळी ९:०० वा पासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे.

या अतिक्रमण हटावच्या कारवाईच्या अनुषंगाने स्वतः सहाय्यक पोलीस अधिक्षक, तहसीलदार अशोक भंडारी, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी पवार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, मुख्याधिकारी आणि सर्व विभागाच्या प्रमुख या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत सहभागी आहेत.

मोठा पोलिस बंदोबस्त

या अतिक्रमण हटवण्यासाठी केज, धारूर, युसुफ वडगाव आणि नेकनुर येथील पोलिसा सोबतच दोन आर सी एफ च्या तुकड्या आणि गृहरक्षक दलाचे जवान असा मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT