बीड

Beed News : अंबाजोगाई शहर पोलीसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर पोलिसांनी शहरातील वाहतूक विस्कळीत करणाऱ्यांवर आज विशेष दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.०० वाजेपर्यंत तथागत चौक, बसस्थानक परिसरात वाहतूक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वारंवार सूचना देऊनही तथागत चौकातील हॉटेलसमोर रस्त्यावर अव्यवस्थित पार्किंग करण्यात आलेली आढळून आल्याने एकूण ३० वाहने पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, रमेश घुले, रमेश सानप, भागवत कांदे तसेच पोलीस अमलदार मंगेश भोळे, बाळासाहेब पारवे, श्रीकृष्ण वडकर, भगवान नागरगोजे, बिभीषण मुंडे, अनिल डोंगरे, निलेश भोसले, तेजस वावळे, हनुमंत लाड, त्र्यंबक फड, अजय गडदे, सुशांत गायकवाड, संदीप मुंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

चार दिवसांपूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अशाच अस्ताव्यस्त लावण्यात आलेल्या दुचाकीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती. त्याचबरोबर संबंधित हॉटेल चालक तसेच इतर अस्थापनांना वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासंबंधीची सूचना देखील देण्यात आली होती. यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये काहीप्रमाणात का होईना सुरळीतपणा आल्याचे दिसून आले. या धडक मोहिमेमुळे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे सामान्य नागरिकांतून विशेष अभिनंदन केल्या जात आहे.

अशा प्रकारची विशेष कारवाई शहरातील विविध भागांमध्ये दररोज बदलत्या ठिकाणी सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली.

यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की, खरेदीसाठी अथवा हॉटेलमध्ये जाताना आपली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी न करता नियोजित ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्क करावीत. तसेच हॉटेल चालक व इतर व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनासमोर ग्राहकांची वाहने शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT