हवेत गोळीबार प्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी तिघांना अटक केली.  Pudhari Photo
बीड

नाथापूरमध्ये हवेत गोळीबार प्रकरणी तिघांना अटक; ५० हजारांचे गावठी पिस्तूल जप्त

Beed Crime News | पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : नाथापूर (ता. बीड) येथे गावठी पिस्टलमधून काही जणांनी १४ मार्चरोजी रात्री हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अजय अण्णासाहेब सावळे (रा. सिदोड), रवी राध्येशाम वक्ते, महादेव सर्जेराव चव्हाण (रा. नाथापूर, ता. बीड) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, धुलीवंदन सणाच्या निमित्ताने रवि राध्येशाम वक्ते यांच्या शेतात जेवणाची पार्टी होती. त्यावेळी रवी याने त्याच्या साथीदाराकडील गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता. रवी याने अजय साबळे याच्याकडील गावठी पिस्तुल घेऊन एक राऊंड हवेत फायर केल्याची कबुली दिली. त्यानंतर सिदोड येथे पोलिसांनी पंचांसमक्ष अजय साबळे याच्या घरातून ५० हजारांचे गावठी पिस्तुल जप्त केले. तसेच काडतुसाची पुंगळी जप्त केली. ही कारवाई पिंपळनेर पोलिसांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT