Beed Municipal Council : सहा नगरपालिकेसाठी अर्ज छाननी प्रकिया पूर्ण Pudhari News Network
बीड

Beed Municipal Council : सहा नगरपालिकेसाठी अर्ज छाननी प्रकिया पूर्ण

बीड नगराध्यक्षपदासाठी 43 अर्ज वैध; लढत चुरशीची

पुढारी वृत्तसेवा

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध

बीड : बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असून, काल दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची आज छाननी करण्यात आली. यंदा नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण लागू असल्याने मोठी स्पर्धा पहायला मिळाली. एकूण ४७ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. छाननीदरम्यान ४ उमेदवारांचे अर्ज त्रुटीमुळे बाद करण्यात आले, तर ४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीची लढत यंदा आणखी रोचक होणार असल्याचे सूचित झाले आहे.

बीड शहरात एकूण २६ प्रभाग असून नगर सेवक पदासाठी कालपर्यंत तब्बल ७७४ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची छाननी प्रक्रिया आज दिवसभर सुरू राहिली. प्रभागनिहाय मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे, विविध पक्षांत चर्चा, गणिते आणि उमेदवारांची धावपळ असा माहोल शहरात दिसून आला. उमेदवारांच्या अपात्र अर्ज विरोधात बुधवारी आक्षेप निवारणाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतरच नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या अंतिम उमेदवारी यादीची घोषणा केली जाणार आहे. या यादीनंतर शहरातील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. यंदाची निवडणूक चुरशीची असेल हे आजच्या छाननीतूनच स्पष्ट झाले आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्ष, आघाड्या, संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्ते पूर्ण उत्साहात निवडणुकीत सहभागी झालेले दिसत आहेत. बीड नगर परिषद निवडणूक २०२५ आता रंगतदार विंगात प्रवेश करत असल्याचे चित्र दिसते.

नगरसेवक 36 तर अध्यक्ष पदाचे 4 अर्ज अपात्र

धारूर : अध्यक्षपदासाठी १६ आणि नगरसेवक पदांच्या २० जागांसाठी एकूण १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आजपासून उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी छाननीदरम्यान अध्यक्ष पदाचे चार व ३६ उमेदवारांचे अर्ज त्रुटी आढळल्याने अपात्र करण्यात आले.

कागदपत्रांतील विसंगती, आवश्यक पुराव्यांची कमतरता आणि तांत्रिक चुका या कारणांमुळे संबंधित अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अध्यक्ष पदासाठी १६ अर्ज आले होते यातील ४ अर्ज अपात्र ठरले असून १२ अर्ज पात्र ठरले आहेत तर २० उमेदवारासाठी १६७ अर्ज आले होते यातील ३६ अर्ज अपात्र ठरले असून १३१ अर्ज पात्र ठरले आहेत.

गेवराई नगराध्यक्ष पदाचे ९ अर्ज तर नगरसेवक २४ अवैध

गेवराई : गेवराई नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अंतिम आकडेवारी जाहीर झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल २१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. मात्र छाननी प्रक्रियेत यापैकी ९ अर्ज अवैध ठरविण्यात आले असून १२ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत.

अंबाजोगाई नगर परिषद

नगराध्यक्ष पदासाठी

  • एकूण आलेले अर्ज २२

  • वैध अर्ज - २०

  • अवैध अर्ज - २

नगरसेवकसाठी

  • एकूण आलेले अर्ज २०५

  • वैध अर्ज - १९०

  • अवैध अर्ज - १५

छाननीत यापैकी २४ नामनिर्देशनपत्र

अवैध, तर ११३ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. अनेक प्रभागांमध्ये ७-१० उमेदवार रिंगणात असल्याने तिरंगी, चौरंगी आणि बहुकोनी लढतीची शक्यता सध्या दिसत असली तरी दि.२१ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लढती स्पष्ट होतील. नगराध्यक्ष पदासाठी २१ तर नगरसेवक पदासाठी तब्बल १३७उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT