पुढारी ऑनलाईन डेस्कः अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने बीडचे आमदार सुरेश धस यांनी आपली जाहीर माफी मागण्याची मागणी केली होती. पण आमदार धस यांनी मात्र माळी हिची माफीची मागणी धुडाकावून लावली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी माळी यांची माफी मागण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रीया दिली आहे.
बीड चे आमदार सुरेश धस यांनी काल परळीमध्ये इंव्हेट मॅनेजमेट पॉलिटिक्स चालते असा आरोप केला होता. यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले होते. याचा विरोध म्हणून प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेऊन धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तसेच महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती.
यासंदर्भात धस यांना पत्रकारांनी छेडले असता. माळी यांनी माझा निषेध केला आहे तर मी ही प्राजक्ता माळी हिचा निषेध करतो. तसेच यापूढे तिचा कोणताही कार्यक्रम पाहणार नाही असेही धस यांनी म्हटले आहे.