kidnapping Pudhari
बीड

Beed minor girl kidnapping: नात्याला काळिमा! मामाच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

सख्ख्या आत्याच्या घरी जाऊन तिच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

पुढारी वृत्तसेवा

गेवराई: तालुक्यात नातेसंबंधांना हादरा देणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या आत्याच्या घरी जाऊन तिच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १५ वर्षे १० महिने वयाची असून आरोपी हा तिचाच मामाचा मुलगा आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दुचाकीवरून आत्याच्या घरी आला. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने थेट मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने बाहेर ओढले. दरम्यान, मुलीची आई तिला वाचवण्यासाठी धावली. मात्र आरोपीने कोणताही मान न राखता तिला जोरात धक्का देत खाली पाडले. आई जखमी अवस्थेत असतानाच आरोपीने मुलीला दुचाकीवर बसवून घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेनंतर कुटुंबीयांनी आरडाओरडा करत आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. अखेर पीडितेच्या आईने चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा (IPC कलम ३६३ व इतर संबंधित कलमांन्वये) नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत असून, या घटनेमुळे गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT